गावठी पिस्टलसह दोघांना अटक

जळगाव : गावठी पिस्टल बाळगणा-या दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. सागर देवीदास सोनवणे व भास्कर अशोक नन्नवरे (दोघे रा बांभोरी ता. धरणगांव जिल्हा जळगाव) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

सागर सोनवणे व भास्कर नन्नवरे हे दोघे तरुण गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांना रवाना केले होते. गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांनी दोघा तरुणांचा शोध घेत त्यांना गावठी पिस्टलसह आव्हाने गावातून शिताफीने ताब्यात घेत अटक केली.

सागर देवीदास सोनवणे याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून 25 हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा गावठी कट्टा (पिस्टल) व दोन काडतुस तसेच भास्कर अशोक नन्नवरे याच्या पॅन्टच्या खिशात 3750 रुपये किमतीचे सहा काडतुस आढळले. दोघांना त्यांच्या ताब्यातील पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्या आला आहे. सहायक फौजदार अनिल जगन्नाथ जाधव, पोहकाँ. अशरफ शेख निजामोददीन, पोकॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, वाहन चालक पोहेकॉ. विजय गिरधर चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here