जळगाव – भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने भुसावळ येथे गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. या संकलन केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला.
भुसावळ शहरातील तापी नदीकिनारी राबवण्यात आलेल्या निर्माल्य संकलन केंद्राकडे गणेश भक्तांनी आपले निर्माल्य सुपुर्द केले. संकलीत करण्यात आलेले निर्माल्य नंतर भुसावळ नगर परिषदेच्या पथकाकडे देण्यात आले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे तालुका अध्यक्ष रितेश भारंबे, तालुका सचिव कोमल नेवे, समन्वयक समन्वयक राहुल फालक, रितेश सोनवणे, यश फालक यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी अथक परिश्रम घेतले.