केरळ येथील दरोड्यात नाशिकचा तरुण सुत्रधार

On: September 21, 2021 12:35 PM

नाशिक – केरळ राज्यातील एका बॅंकेत दरोड्याची घटना घडली  होती. या घटनेत बॅंकेतील सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले होते. या दरोड्याच्या तपासात केरळ पोलिसांनी सातारा येथील तिन पैलवानांना अटक केली होती. या लुटीत सातारा येथील पैलवानांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सातारा व केरळ पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरु केली.

या कारवाईत या लुटीचा मास्टरमाईंड नाशिक येथील मुळ रहिवासी निक उर्फ निखील जोशी असल्याचे उघड झाले आहे. निखील जोशी याच्यासह सातारा येथील तिघा पैलवानांना अटक करण्यात आली आहे. निखील जोशी याच्यासह तिघा पैलवानांनी केरळ राज्यातील बॅंकेत दरोडा टाकल्याचे चौघांनी कबुल केले आहे.  

निखिल जोशी (नाशिक), सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे (तिघे रा. सातारा) अशी अटकेतील चौघा दरोडेखोरांची नावे आहे. सातारा पोलिसांनी त्यांना सातारा परिसरातून अटक करत केरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment