जळगाव – आज सकाळीच जळगाव उप प्रादेशिक कार्यालयाचा ताबा व्हिजीलंस पथकाने घेतल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नसून कार्यालयीन चौकशी कसून सुरु आहे. नेमके कोणते पथक आले असून काय कारवाई व चौकशी सुरु आहे याबद्दल निश्चित माहिती बाहेर आली नाही.
आलेल्या पथकाने कार्यालयाचा ताबा घेतल्यामुळे सरकारी कामासाठी परगावाहून व शहरातील वाहनधाकरकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. या कार्यालयात व कार्यालयाच्या बाहेर नेहमी दलालांचा विळखा पडलेला असतो. ऑनलाईन कामे होत असल्याचा दिखावा केला जात असला तरी दलालांच्या माध्यमातूनच कामे कशी होतील या दृष्टीकोनातून वाहनधारकांना त्रास दिला जात असल्याचे देखील म्हटले जाते. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.