अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाल्याने खळबळ माजली आहे. प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप आणि राहुल फुंदे अशा सर्व जणांविरुद्ध संरक्षण अधिकारी तथा पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोशल मिडीयाला मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज देत संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप अटकेतील सर्व सहा जणांवर करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष यांच्यासह सदस्यांच्या मंदिर भेटीचे फुटेज प्रसारीत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जण दोषी आढळून आल्याचे म्हटले जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे.