बेकायदा देशी दारु विक्रेता अटक

जळगाव : खेडी बस स्थानकानजीक देशी दारुची बेकायदा विक्री करणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पो.कॉ. संदीप विठठल धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. किशारे उर्फ साडु माधवराव बावीस्कर रा.खेडी – जळगाव असे अटकेतील दारु विक्रेत्याचे नाव आहे.

जळगाव शहरातील गोदावरी कॉलेज समोर असलेल्या खेडी बसस्टॉपच्या मागे आडोशाला किशारे बाविस्कर हा विनापास परवाना देशी दारुची चोरटी विक्री करतांना पथकाला आढळून आला. त्याच्या ताब्यातून 52 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल पाटील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना.अतुल पाटील, पो.ना. सुधीर साळवे, पो.कॉ. नरसिंग पाडवी, पो.कॉ. चंद्रकांत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.विना पास परवाना अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई यापूर्वी सुद्धा संबंधित दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here