जळगाव दि. 25 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गट 1 मधून 868 तर गट 2 मधून 393 म्हणजेच 1261 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. त्यातून निवड समितीने 65 एकांकिका निवडलेल्या आहेत. निवड करण्यात आलेल्या एकांकिकीच्या चित्रफिती गांधी रिसर्च फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या आहेत. वरील चित्रफितींना 30 सप्टेंबर पर्यंत लाईक करण्यासाठी संधी दिलेली आहे. 60% परीक्षकांचा निर्णय आणि 40% गांधीतिर्थच्या सोशल मीडियातून मिळालेल्या लाईक्स (पब्लिक पोल) यांचा विचार करून विजेते निवडले जाणार आहे. महात्मा गांधीजींच्या १५३ व्या जयंतीच्या ऑनलाईन कार्यक्रमात विजेत्यांचे नावे जाहिर करून त्यांना गौरवण्यात येईल.
दोन गटासाठी भरघोस रोख पारितोषिके
पहिला गट 5 ते 10 वी इयत्तेतील स्पर्धकांचा आणि दुसरा गट 11 वी ते खुला असे दोन गट आहेत. त्यातील पहिल्या गटातून निवड समितीने एकूण 40 चित्रफितींची निवड केली. त्यात 22 मराठी, 13 हिंदी, 5 इंग्रजी तर दुसऱ्या गटातील 12 मराठी, 12 हिंदी आणि 1 इंग्रजी अशा 25 चित्रफितींची निवड झालेली आहे. या दोन्ही गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन व दोन उत्तेजनार्थ असे विजेते निवडले जातील. स्पर्धेसाठी आयोजकांनी भरघोस अशी रोख पारितोषिके ठेवलेली आहेत. पहिल्या गटासाठी प्रथम – (15000), द्वितीय – (11000), तृतीय – (7000), आणि दोन उत्तेजनार्थ (प्रत्येकी 5000) रुपये असे पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी विजयी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 21000 (प्रथम), 15000 (द्वितीय), 10000 (तृतीय) आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
चित्रफिती लाईक करण्यासाठी लिंक
स्पर्धेसाठी प्राप्त चित्रफितींना खालील लिंकवर जाऊन 30 सप्टेंबर पर्यंत लाईक करता येईल.
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/gandhiteerth/
यूट्यूब लिंक : https://www.youtube.com/c/GandhiTeerth