नाशिक : बुकींच्या अड्ड्यावर छापा टाकण्यापुर्वी अर्थपुर्ण व्यवहार करण्याच्या प्रयत्नात व चार लाख रुपयांची मागणी करणारा पीएसआय एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ माजली आहे. नाशिक ग्रामीण एलसीबीमधे कार्यरत महेश शिंदे असे संबंधीत पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे.
बुकींच्या अड्ड्यावर रेड टाकण्याचा धाक दाखवत अर्थपुर्ण व्यवहार करण्याच्या प्रयत्नातील महेश शिंदे यांनी बुकीकडे चार लाख रुपयांची मागणी केली होती. बरीच घासाघीस केल्यानंतर तिन लाख रुपयात तंटा मिटवण्याचे ठरले. याप्रकरणी संजय खराडे या मध्यस्ताला देखील एसीबीने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.