माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी विदेशात पलायन केल्याचा तपास यंत्रणांना दाट संशय आहे. तो संशय गडद झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे. एनआयएने गेल्या महिन्यात कित्येकदा समंस बजावून देखील सिंग यांचा कुठे तपास लागलेला नाही.
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंग यांचा जवाब घेण्यात आला होता. एनआयएच्या दोषारोप पत्रात परमबीर सिंग यांचा समावेश असल्याचे म्हटले गेले आहे. परमबीर सिंग आता नेमके कुठे आहेत याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यात पाच एफआयआर दाखल आहेत. त्यातील तीन प्रकरणांचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडीसह ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली आहे.