जळगाव : कुंटणखाना चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. या व्यवसायातून रोजगार निर्मीतीसह समाजात घडणा-या चुकीच्या घटनांवर कमी अधिक प्रमाणात अंकुश बसतो. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते मान्य नाही. जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात काल रात्री एका कुंटणखान्यावर धाड टाकण्यात आली. भाड्याने घेतलेल्या घरात हा व्यवसाय सुरु होता. एक मालकीन, दोघे दलाल, दोन पिडीत असे सर्वजण एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात आढळून आले.
दलाल ते वेश्या व्हाया मालकीन अशा मार्गाने ग्राहकाचा याठिकाणी प्रवास होत असे. ग्राहकाच्या तिन हजार रुपयांची या प्रवासात विभागणी होत असे. तिन हजार रुपये संबंधीत पिडीतेच्या हातात ग्राहकाने टेकवल्यानंतर त्यातील हजार रुपये मालकीन घेत असे. त्यातील पाचशे रुपये दलालाकडे वळते व्हायचे. राहिलेले पैसे पिडीतेची कमाई रहात होती.
सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हे.कॉ. गफ्फार तडवी, पोलिस नाईक सुनिल सोनार, हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, निलेश पाटील, पोलिस नाईक महेश महाले, पोलिस नाईक रविंद्र मोतीराया, चालक इम्तीयाज खान आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. यातील पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून मालकीनीसह दोघा दलालांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सपना एअरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध स्त्रीया व मुली अनैतीक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.