गांधी रिसर्च फाउंडेशन – राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल

जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी केली. त्यात प्रथम गटातील अर्णव निशांत शिवलकर(गुंदेचा एज्युकेशन अकॅडमी, कांदिवली मुंबई) हा तर द्वितीय गटातून रितेश कुमार (नॅशनल इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कुरुक्षेत्र सोनीपत हरियाणा) हे प्रथम ठरले. भारतभरातून सुमारे 16 हून अधिक राज्यांच्या 1336 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांनी महात्मा गांधीजींचे जीवनकार्य, त्यांचे विचार अशा विविध पैलूंवर कल्पक, वैशिष्ट्यपूर्ण एकांकीका सादर केल्या.

महात्मा गांधीजींनी जवळजवळ सर्वच विषयांवर चिंतन केले, आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील अभिनय हा तर त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यासाठी स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

पहिल्या गटात प्रथम ठरलेल्या अर्णव शिवलकर यांने माणूस जीवन जगत असताना मुखवटे धारण करतो परंतु महात्मा गांधीजींनी दिलेला संदेश त्याने चपखल मांडला की, आपल्या आतमध्ये असलेल्या गुणांनी माणूस सुंदर ठरतो त्याला कोणत्याही मुखवट्यांची गरज पडत नाही. तर दुसऱ्या गटात पहिल्या ठरलेल्या कुरुक्षेत्र सोनीपत हरियाणाचा स्पर्धक रितेश कुमार यांने दक्षिण आफ्रिकेतील ट्रेनमधून महात्मा गांधीजींना उतरविले गेले व त्यांचे जीवन कसे बदलले हे अत्यंत कल्पकपणे सादर केले होते.
राष्ट्रीय एकांकिका स्पर्धा निकाल

प्रथम गट– प्रथम – अर्णव निशांत शिवलकर(गुंदेचा एज्युकेशन अकॅडमी, कांदिवली मुंबई), (15 हजार रुपये व प्रमाणपत्र), द्वितीय – देवांश मालवीय (शारदा विद्यामंदीर भोपाल मध्यप्रदेश), (11 हजार रुपये व प्रमाणपत्र), तृतीय- स्वानंदी अनिल ठांणगे, (7 हजार रुपये व प्रमाणपत्र) तीन उत्तेजनार्थ – स्वप्नाली संतोष चौगुले, (न्यू इंग्लिश स्कूल भालवनी, जि. सोलापूर), कुशल नितीन माळी (नवापूर जि. नंदूरबार), पूर्वा जाधव (अच्युतराव अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव) या तिन्ही विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये तीन भागात विभागून देण्यात आले.

द्वितीय गट – प्रथम- रितेश कुमार (नॅशनल इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कुरुक्षेत्र सोनीपत हरियाणा, (21 हजार रुपये व प्रमाणपत्र), द्वितीय – संदीप घोरपडे, संदीप बापुराव घोरपडे (अमळनेर जि. जळगाव) (15 हजार रु व प्रमाणपत्र) तृतीय- प्रीती मोहन शिंदे (गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बेळगाव कर्नाटक), (10 हजार रुपये व प्रमाणपत्र) उत्तेजनार्थ – न्यासा ओजस्वी, (रामजस स्कूल, नवीदिल्ली), नंदिनी बॅनर्जी, (गुंदेचा एज्युकेशन अकॅडमी, कांदिवली मुंबई) यांना प्रत्येकी 5 हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक जाहीर केले जाईल. स्पर्धेत सहभागी सर्वच स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.
इतक्या स्पर्धकांमधून पहिल्या तीन स्पर्धकांना निवडणे ही मोलाची कामगिरी निवड समितीचे सदस्य शंभू पाटील, हर्षल पाटील, मंजुषा भिडे, कमलजी, अभिनव चतुर्वेदी, मंगेश कुळकर्णी, निमिष, धर्मराज देवकर, विशाल कुळकर्णी यांनी अचूकपणे केले. या स्पर्धेसाठी तांत्रिक बाजू जगदीश चावला, योगेश संधानसिवे, भूषण मोहरीर, जितेंद्र कोतवाल यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here