गोंदिया (अनमोल पटले) : गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने नक्षलग्रस्त असलेल्या पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत येत असलेल्या भरनोली आऊटपोस्टमधील आंबेझरी ते नागणडोह मार्गावरील जंगलात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्पोटक साहित्याचा शोध लावून साठा हस्तगत केला आहे.
गडचिरोली गोंदियाचे पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम जिल्हा पोलिसांनी राबवली.मिळालेली माहितीनुसार आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सी 60 जवानांचे पथक आणि पोलिसांची एक चमू सर्चिंग मोहीमेवर असताना त्यांना नागनडोह मार्गावरील जंगलालगतच्या मार्गावर स्पोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने शोध मोहीम सुरु केली असता अंदाजे 67 डेटोनेटर,23 जलिटीन रॉड,वायरसह अन्य विस्पोटक साहित्य घटनास्थळावरुन हस्तगत केले आहे.
पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.