बुलढाणा : शरीरसुखाला चटावलेल्या पतीने आपल्याच पत्नीचा कु-हाडीने खून केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे 10 ऑक्टोबरला उघडकीस आली आहे. दिक्षा संतोष ठाकरे (30) असे मयत पत्नीचे तर संतोष गुरुदेव ठाकरे (35) मारेकरी असलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.
तु मला नेहमीच शरीर सुख देत नाही असे म्हणत संतोष याने पत्नी दिक्षा सोबत शनिवारच्या रात्री वाद घातला. हा वाद वाढतच गेल्याने संतापाच्या भरात संतोषने पत्नी दिक्षा हिच्या मानेवर व डोक्यावर कु-हाडीचे सहा ते सात घाव घालत तिला ठार केले. घटनेनंतर सकाळी संतोषने स्वत:च घाटंजी पोलिस स्टेशनला हजर होत केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली.
याप्रकरणी संतोष ठाकरे याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. मयत दिक्षा व आरोपी पती संतोष यांना सात वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा मुलगा आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. किशोर भुजाडे व सहकारी करत आहेत.