नागपूर : आज सकाळी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. आजच्या कारवाईत अनिल देशमुख व त्यांच्या सुनेला सीबीआय पथकाने चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिस व रा.कॉ. कार्यकर्ते यांच्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
सीबीआयच्या सात अधिका-यांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या देशमुख यांच्या मुलाला व सुनेला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी रा. कॉ. कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
रा. कॉ. कार्यकर्त्यांनी यावेळी सीबीआय, पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री आदींविरुद्ध नारेबाजी केली. गेल्या सुमारे एक महिन्यापासून अनिल देशमुख नागपुर स्थित निवासस्थानी नाहीत. लुक आऊट नोटीस नंतर सर्च ऑपरेशन कारवाईची सीबीआयची ही पद्धत असल्याचे म्हटले जात आहे.
शरीर सुखाला दिला नकार – पतीने केले पत्नीला ठार