दहा रुपये,समोसा आणि आत्महत्या

काल्पनिक छायाचित्र

नागपूर : घरातून कुणाला  न सांगता दहा रुपये घेवून समोसा आणणे शाळकरी मुलासाठी जिवघेणे ठरले. हा प्रकार त्या शाळकरी मुलाच्या मोठ्या भावाने आईला सांगितला. एवढेच नाही तर आणलेला समोसा देखील खाऊन घेतला. त्याला आईने रागावल्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या त्या लहान मुलाने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. नागपुरच्या गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

काटोल मार्गावरील गंगानगर भागात नथुजी जमुनाप्रसाद साहू (३६) हे आपल्या परिवारासह राहतात. पत्नी व दोन मुलांचा संसार असलेले साहू भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.  त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा विरू यास रात्री समोसा खाण्याची इच्छा झाली. त्याने घरात ठेवलेले दहा रुपये गुपचुप घेतले व बाहेरून समोसा विकत आणला. रात्री विरू घरात आला तेव्ह्या त्याचा मोठा भाऊ घरात होता तर आई शेजारी गेली होती.

समोसा घेण्यासाठी पैसे कुठून घेतले असा  प्रश्न त्याने विरु यास विचारला. त्यावेळी आपली चोरी पकडली गेल्यामुळे विरु घाबरला. त्याच्या मोठ्या भावाने हा प्रकार आईला सांगितला. चोरी पकडली गेल्यानंतर आईने विरुला रागावण्यास सुरुवात केली. दरम्यान त्याच्या मोठ्या भावाने तो समोसा खावून टाकला. त्यामुळे लहान विरुच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली. 

तो काहीवेळाने किचनमध्ये गेला. आतून दार लावून घेत स्टूलवर उभा राहून आईच्या साडीने छताला असलेल्या हुकाच्या मदतीने गळफास घेतला. काहीवेळाने आतून स्टूल पडल्याचा आवाज आयाने विरुच्या भावाने आईला जोरात आवाज दिला. दरम्यान गळफास घेतलेल्या विरुचा जिव गेलेला होता. आरडाओरड झाल्यामुळे शेजारचे लोक धावत आले. गळफास घेतलेल्या विरुला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तो मयत झालेला होता. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. क्षुल्लक कारणामुळे घडलेली ही घटना मन सुन्न करणारी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here