नाशिक : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या अभिलेख्यावरील तडीपार गुन्हेगार निखिल ऊर्फ निकू अनिल बेग (23), रा. द्वारका नाशिक, सराईत गुन्हेगार विशाल संजय अडांगळे (24), इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर नाशिक, साहिल ऊर्फ सनी शरद गायकवाड (23), रा. पंचवटी नाशिक, ज्ञानेश्वर ऊर्फ नीलेश कारभारी लोहकरे (25), रा. राणाप्रताप चौक नाशिक, रोशन संजय सुर्यवंशी (19), राणाप्रताप चौक नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच तरुणांपैकी एका जणाच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतीक संबंध असल्याचा संशय होता. त्या संशयातून संबंधीत संशयीत तरुणाचा खून करण्याचा कट आयटी पुलानजीक आखला जात असल्याची माहिती अंबड पोलिसांना लागली. पोलिसांच्या पथकाने धरपकड करत चौकशीअंती पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस व तिन कोयते अशी घातक शस्त्रे जप्त केली. त्यांना शस्त्रासह अटक करण्यात आली.
अटकेतील एकाच्या पत्नीसोबत एका तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा त्यांना संशय होता. त्या संशयातून त्या तरुणाची हत्या करण्याचे नियोजन सुरु असतांनाच ते पोलिसांच्या हाती लागले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस नाईक किरण गायकवाड, हेमंत आहेर, राकेश राऊत, अनिरुद्ध येवले, नितीन सानप, मुकेश गांगुर्डे, मुरली जाधव, योगेश शिरसाठ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.