जळगाव : जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात महिला दक्षता समिती कार्यालयात सहायक फौजदार मिलिंद केदार यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या घटनेने जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सापळा पार पाडला. एका प्रकरणात तडजोड करण्याकामी मिलिंद केदार यांनी 25 हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजारात तडजोड झाली.