अकोला : पुरुष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणा-या अकोला येथील डॉक्टरचा भंडाफोड झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने अकोला शहर व जिल्ह्यात खळबळ माजली आहे. डॉ. अनंत शेवाळे असे या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. अनंत शेवाळे हे पुरुष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची सत्यता पडताळणीसाठी एका यु ट्युब चॅनलच्या प्रतिनिधीने रुग्णाच्या भुमिकेत रुग्णालयात प्रवेश केला. स्टींग ऑपरेशन दरम्यान रुग्ण तपासणीच्या नावाखाली दवाखान्यात वेगळाच प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला.
रुग्णाच्या भुमीकेत गेलेल्या यु ट्युब चॅनलच्या प्रतिनिधीसोबत डॉक्टरांनी कपडे काढून अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे डॉ. अनंत शेवाळे यांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भा.द.वि. 377 नुसार डॉ. शेवाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.