जळगाव : यावल तालुक्यातील अकलुद या गावी हॉटेल राजे परिसरात बेकायदा गावठी कट्टा व चॉपरच्या धाकावर दहशत माजवणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी (19) रा.तापी नगर भुसावळ व धिरज केशरसिंग जाधव (26) रा.मोरेश्वर नगर भुसावळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्य मार्गदर्शनाखाली स.फौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्षमण पाटील, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.ना रणजित जाधव, पो.ना किशोर राठोड, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.