नाशिक : नशेसाठी व्हाईटनर न देणा-या तरुणाचा खून करणारा संशयीत गजाआड करण्यात आला आहे. आकाश गोपाळसिंग आडे (रा. नांदेड) असे हत्या करणा-या संशयीताचे नाव आहे. नाशिकच्या भद्रकाली दुध बाजारात त्याने सोन्या उर्फ नितीन पिराजी गायकवाड (म्हाडा कॉलनी वडाळा) याची चाकूने भोसकून हत्या केली होती. घटनेनंतर संशयीत सोन्या फरार झाला होता.
फरार संशयीत सोन्या यास नांदेड येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर, दत्ता पवार, ज्ञानेश्वर मोहिते, युवराज पाटील, राजु निकम, सचिन अहिरराव, रमेश कोळी, उत्तम पवार, सागर निकुंभ, उत्तम खरपडे, जितेंद्र पवार यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.