डुग्गीपार पोलीसांच्या कारवाईत सुगंधी तंबाखू जप्त

गोंदीया (अनमोल पटले) : डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पो.नि. सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणातील प्रतिबंधीत सुगंधी तंबाखू ट्रकसह जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ माजली आहे.

रायपूरमार्गे नवेगाव बांधच्या दिशेने जात असलेल्या ट्रकमधे प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती पो.नि. सचिन वांगडे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पो.नि. सचिन वांगडे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने नवेगाव टी पॉईंट कोहमारा चौकात नाकाबंदी केली. या मार्गाने नाकाबंदीदरम्यान संशयीत ट्रक (एमएच 40 बिजी – 3444) ची तपासणी करण्यात आली. त्या ट्रकमधे सुगंधी तंबाखूचे 27 बॉक्स ज्यामध्ये 500 ग्रॅम वजनाचे 538 बॉक्स (किंमत रु. 10,25,670/-), 10 प्लास्टिक पोती ज्यामध्ये सुगन्धित तंबाखूचे (ईगल) 400 ग्रॅम वजनाचे 400 पॅकेट (एकुण किंमत रु. 2,16000/-) व गुन्ह्यात वापरलेला ट्रक (अंदाजे कि.10,00000/-) असा एकुण 22,41,670/- रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला.

ट्रकमधील प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूबाबत भंडारा अन्न सुरक्षा सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन भंडारा यांना पत्राव्दारे माहिती देण्यात आली. या प्रकरणी संशयीत शाहरुख नासिर खान (27) रा. नागपुर, गणेश गुप्ता रा.चंद्रपुर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न. 280 /2021 भा.द.वि. 188, 272, 273, 328 सह कलम 3, 26 (2) (i), 26 (2) (iv), 27 (2) (e) , 30 (2) (a), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार नोंद करण्यात आला.
गोंदीयाचे पोलिस अधिक्षक विश्व पानसरे तसेच गोंदीया कॅंप देवरीचे अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर, जालंधर नालकुल उपविभागीय अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन वांगडे, स.पो.नि. संजय पांढरे, नाईक पोलिस कॉ. झुमन वाढई, पो.कॉ. महेंद्र सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here