जळगाव : भुसावळ शहरातील मॉडर्न रोड येथील हरी ओम इलेक्ट्रॉनिक या दुकानातून 17 व 18 जुलै दरम्यान रात्री चोरी झाली होती. या घटनेत चोरटयांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला होता. या चोरीत 2,26,350 रुपयांचा माल चोरीला गेला होता.
दुकान मालक सुरेंद्र वालवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.ला भाग 5 गुरन 0739/2020 भादवी कलम-454,457,380 प्रमाणे दाखल होता.
या गुन्हयांच्या तपासात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून संशयित आरोपी फिरोज शेख अकिल गवळी (24) रा. जाममोहल्ला, मजिद जवळ भुसावळ तसेच आरोपी रज्जाक उर्फ राजा शेख रहीम (28) रा.जाममोहल्ला भुसावळ या दोघांना भुसावळ शहराच्या जाममोहल्ला परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरी. संदीप परदेशी,अनिल मोरे, पो.ना.रमण सुरळकर, रविंद्र बिऱ्हाडे, पो.काॅ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख यांनी तपासात सहभाग घेतला.