डंपरच्या धडकेत महिलेचा बळी

जळगाव : अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक एका महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेस आपले प्राण गमवावे लागले आहे.

कालच जळगाव शहरात शिव कॉलनी नजीक एका भरधाव वेगातील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एका रिक्षाचा पार चेंदामेंदा करुन टाकला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोवर या दुस-या दुर्दैवी घटनेने जन्म घेतला असून महिलेचा मृत्यू ओढवला आहे.

या घटनेत डंपरच्या पुढील चाकात दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचे वृत्त समजताच नशिराबाद पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक साळुंखे व एक कर्मचारी घटनास्थळावर रवाना झाले आहेत. मृत महिला कुठून कुठे जात होती व तिचे नाव अद्याप समजू शकले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here