औरंगाबाद – बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून भावाने सख्ख्या बहिणीची कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. औरंगाबाद येथील लाडगाव येथे घडलेल्या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
किशोरी मोटे असे हत्या झालेल्या 19 वर्षीच्या तरुणीचे नाव आहे. हत्या करणा-या तिच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतापाच्या भरात त्याने बहिणीचा कोयत्याने गळा चिरुन तिला ठार केले आहे. या घटनेत हत्या झालेल्या तरुणीचे धड आणि शीर वेगळे झाले आहे.