जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाने एका विद्यार्थ्याचे मायग्रेशन सर्टीफिकेट दुस-याच विद्यार्थ्यांला पोस्टाने पाठवल्याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. “उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कारभार वा-यावर”– एकाचे मायग्रेशन गेले दुस-याच्या पत्त्यावर” या मथळ्याखाली सदर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. विद्यापीठ व्यवस्थापनाला आपली चूक “क्राईम दुनिया” च्या माध्यामातून समजली. चोवीस तासांच्या आत संबंधित टेबलवरुन संबंधित विद्यार्थ्याला फोन आला. झाल्या प्रकाराबद्दल आणि मनस्तापाबद्दल सबंधित विद्यार्थ्याची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठात व्यक्तिशः बोलावण्यात आले असून हातोहात त्याचे मायग्रेशन सर्टीफिकेट घेऊन जाण्यास सांगितले आहे.
असे असले तरी संबंधित विद्यार्थ्याला एसटी बंदच्या कालावधीत जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतर कापून जळगावला बोलावण्यात आले आहे. हा प्रकार देखील एक प्रकारे मनस्ताप देणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याला वेळ आणि प्रवास खर्चाच्या भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे.
यापूर्वी अनेक घटनेच्या माध्यमातून उमविचा कारभार बघून विद्यार्थी मनोमन नाराज झालेले आहेत. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे रिचेकिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्याना वेळेचा आणि धनाचा भुर्दंड बसला आहे. रिचेकिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गुण कमी दिल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे.









