अधिका-याच्या चौकशीकामी समिती दाखल
बिड : शासकीय कामासाठी तयार करण्यात आलेल्या सोशल मिडीया गृपवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याचे प्रकरण सध्या बिड जिल्हयात गाजत आहे. या प्रकरणी शहर विभागाच्या महिला बाल विकास प्रकल्प अधिका-याच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
शासकीय काम वेळेत व्हावे आणि संदेश लवकर मिळावा या हेतूने कार्यालयाचा गृप तयार केला जातो. बिड येथील महिला बाल प्रकल्प विभागाने अधिकारी व कर्मचा-यांसह अंगणवाडी सेविकांचा बिड आयसीडीएस अर्बन या नावाचा गृप तयार केला होता. या गृपमधे बिड शहर, गेवराई, माजलगाव, धारुर येथील कर्मचारी जोडले गेले होते. याच गृपवर महिला बाल प्रकल्प अधिका-याने आक्षेपार्ह फोटो अपलोड केला होता. या अधिका-याच्या चौकशीकामी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे. या प्रकरणी त्रिसदस्य समिती त्या अधिका-याचा चौकशी अहवाल दोन दिवसात दाखल केला जाणार असल्याची माहीती देण्यात आली आहे. या त्रिसदस्यीय समितीच्या सदस्या अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. दोषीवर निश्चीत कारवाई होईल असे हर्षदा देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.