तहसीलदार देवरे यांची वाळू वाहतुकीवर कारवाई

जळगाव : धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे व त्यांच्या पथकाने बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली आहे. कारवाईसाठी पथक आल्याचे बघून पळून जाणाऱ्या ट्रॅक्टरवरच तलाठी, कोतवाल यांच्यासह तहसीलदारांनी ठाण मांडल्याने ट्रॅक्टर चालकास पळून जाता आले नाही.

तीन वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी म्हटले आहे. गिरणा नदी पात्रात अवैध रेती उत्खनन व वाहतूक करताना वाहने आढळल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे देवरे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here