अनाधिकृत बायोडिझेलची विक्रीप्रकरणी तिघे ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : अनधिकृत बायो डिझेलचा साठा व चोरटी विक्री करणा-या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून बायो डीझेलसह दोन वाहने हस्तगत करण्यात आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या बायो डिझेलची किंमत 68 हजार 800 रुपये व दोन्ही वाहनांची किंमत 14 लाख 50 हजार रुपये आहे.

जळगाव एमआयडीसी हद्दीत बोलेरो पिकअप (एमएच 19 एस 5715) द्वारे बायोडिझेलची चोरटी विक्री होत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकरी व कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने सदर बोलेरो वाहनाचा शोध घेण्यात आला. पेट्रोलिंग दरम्यान फातीमा नगर, श्रृषीराज इंडस्ट्रीज पीव्हीसी पाईप पॉलीमर सेक्टर नंबर 119 च्या बाजुला असलेल्या मोकळया मैदानात सदर वाहनासह तीन इसम आढळून आले. या जागेवर असलेल्या ट्रक (एमएच-19 -झेड-2577) मधून अनाधिकृतपणे बायोडिझेलची चोरटी विक्री तिघे जण करत होते.

दानिश शेख अन्वर शेख (2३) रा.उमर मशिद जवळ मास्टर कॉलनी,जळगाव हा नोझेल मशिनद्वारे डिझेल भरण्याचे काम करत होता. शोएब खान मंजुर खान (33) रा.गणेशपुरी साहिल किराणा समोर, मास्टर कॉलनी,जळगाव हा ट्रक चालक म्हणून काम करणारा होता. अली दय्यान अली अब्बास (43) रा.बिलाल चौक, तांबापुरा,जळगाव हा त्यांचा साथीदार होता. दोघा वाहनांसह तिघा इसमांना बायो डिझलसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 68800 रुपये किमतीचे बायोडिझेल व 14 लाख 50 हजार रुपये किमतीचे दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी पुरवठा तपासणी अधिकारी डि.बी.जाधव यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, पो.हे.कॉ. सुनिल दामोदरे, महेश महाजन, पो.नाईक विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, पो.कॉ. पंकज शिंदे, हेमंत पाटील, चालक पोहेकॉ विजय चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या पथकाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल मोरे व त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोना मुदस्सर काझी, पोना योगेश बारी यांचे सहकार्य लाभले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here