नोकरीचे आमीष दाखवणारा अटकेत

जळगाव : सुशिक्षीत बेरोजगार तरुणीला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिस पथकाने अटक केली आहे. तरुणीच्या आईने या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा गु.र.न. 976/20 भा.द.वि.420. 406, 34 नुसार दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील फिर्यादी महिलेचा जळगाव शहरातील एका व्यापारी संकुलात जुने कलर टीव्ही विक्रीचे दुकान आहे.  या महिलेची मुलगी पदवीधर असून ती नोकरीच्या शोधात होती. या महिलेकडे तिच्या मुलीचा मित्र आकाश मनोहर पाटील याचे नेहमी येणे जाणे होते. आपले वडील रेल्वेत टीसी असून त्यांच्या ओळखीने रेल्वेत मुलीला नोकरी लावून देतो असे त्याने फिर्यादी महिलेस दोन वर्षापुर्वी आमीष दाखवले होते.

दोन वर्षापुर्वी त्याने नोकरीच्या फॉर्म साठी दहा हजार रुपये व त्यानंतर वेळोवेळी विविध कारणे सांगुन सात लाख रुपये घेतले. त्याच्या आमीषाला बळी पडून फिर्यादी महिलेने त्याला रक्कम दिली. पैसे घेतांना आकाश याचे वडील मनोहर पाटील हे देखील हजर होते. त्यानंतर नोकरी मिळाली नाही व त्याने पैसे देखील परत केले नाही. याप्रकरणी आकाश पाटील व त्याचे वडील मनोहर पाटील या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुलीची व तिच्या आईची फसवणूक झालेल्या या घटनेतील आकाश मनोहर पाटील यास अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व पो.कॉ. योगेश बारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here