धरणगावला पत्रकार दिन उत्साहात

जळगाव : धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात झाला. शासकिय विश्रामगृह धरणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले

याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अँड. वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे सदस्य अँड. वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन, धर्मराज मोरे, भगीरथ माळी, बी.आर.महाजन, जितेंद्र महाजन, आर.डी. महाजन, अविनाश बाविस्कर, बाळासाहेब प्रभूदास जाधव, सतीश शिंदे, विनोद रोकडे, योगेश पाटील, दिनेश पाटील, धनराज पाटील, लक्षमण पाटील, पी.डी. पाटील, राजेंद्र वाघ यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here