जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : आपले पोलीस संरक्षण काढण्याची मागणी करणा-यांपासून आपल्या जीवाला धोका निर्माण करण्याची योजना असू शकते. रेशन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यामुळे तत्पूर्वी आपणास “मँनेज” करण्याचे प्रयत्न फसल्याने वाळूमाफियांच्या प्रायोजकत्वाखाली कथित आंदोलनाचा घाट घातला जात असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी “क्राईम दुनिया”ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मला सुमारे दीड वर्षापासून पोलीस संरक्षण असून तेव्हा अशी मागणी संबंधितांनी का केली नाही? मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांसाठी जाहीर केलेली मोफत धान्य योजना काही भ्रष्ट रेशन दुकानदारांकडून फस्त केली जात असल्याचे दिसताच मी आवाज उठवला. थेट राष्ट्रपतींकडे दीड वर्षापासून यांच्या तक्रारी दिल्या आहेत.
त्याप्रमाणे वाळू माफियांविरुद्व शासनाच्या बाजूने मोहीम राबवली. वाळू व्यावसायिकांना सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा दंड झाला आहे. या माध्यमातून शासनाला करोडो रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे वाळू व्यावसायिकांच्या प्रायोजकत्वावर रेशन दुकानदार संघटना पदाधिकारी रिपाई तर्फे आंदोलनात उतरलेले दिसत आहेत. माझ्यावर हल्ल्याची ही एक रणनीती अर्थात योजना असू शकते असे दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा देणारे अनिल अडकमोल रेशन दुकानदार संघटनेचे नेतृत्व करत असून या मंडळींनी यापूर्वी दिलेली ऑफर आपण धुडकावली असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी पुढे बोलतांना म्हटले आहे. आपण मँनेज झालो नाही म्हणून दबाव टाकण्यासाठी रेशन भ्रष्टाचा-यांचे आंदोलन चालवणा-यांनी वाळूमाफीयांकडून सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचे अर्थकारण करुन आंदोलनाचा देखावा मांडला आहे. महसुलच्या चौकशीत रेशन गव्हाचा भ्रष्टाचार करतांना जिल्हाधिका-यांनी केलेला दंड त्यानी भरावा यातच त्यांचा दोष सिद्ध झाला आहे. आता जिल्हाधिका-यांनी दुकाने काढून घेण्यासह दक्षता समितीवर राहिलेल्यांनी आजवर काय काम केले? असाही प्रश्न गुप्ता यांनी विचारला आहे.