अजमेरच्या गुन्ह्यातील आरोपीस भुसावळला अटक

जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात अजमेर रेल्वे पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. शेख रईस शेख रशीद (25) असे अटक करण्यात व राजस्थान रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शेख रईस शेख रशीद हा भुसावळ येथील मुस्लीम कॉलनी खडका रोड परिसरात वास्तव्यास असल्याचे अजमेर पोलिसांना समजले होते. त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांची भेट घेत मदतीची मागणी केली. पो.नि. भागवत यांनी आपल्या गुन्हे शोध पथकातील कर्मचा-यांच्या मदतीने आरोपी शेख रईस शेख रशीद यास ताब्यात घेत जिआरपी रेल्वे पोलीस अजमेर (राजस्थान) पोलिसांच्या हवाली केले. पो. नि. दिलीप भागवत सो यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक महेश घायतड, पो.ना.निलेश चौधरी, दिनेश कापडणे, पो. कॉ. ईश्वर भालेराव ,पो.ना.गोपाल गव्हाळे पो. कॉ. सागर वंजारी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here