गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांकडे छापेमारी?

पुणे : जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संस्था संचालकांचे अपरहण व खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरुद्ध कोथरुड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला हा गुन्हा जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. त्यांनतर शून्य क्रमांकाने हा गुन्हा पुणे येथे वर्ग करण्यात आला.

गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या पाच जणांच्या घरी पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याचे वृत्त आहे. उशिरा रात्रीपर्यंत या पाचही जणांकडे झाडाझडती सुरु होती. अँड. विजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे तसेच इतर 29 जणांविरुद्ध सदर गुन्हा दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here