जळगाव : जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील डिसेंबर 2019 अखेर 128 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
या भरती प्रक्रिये दरम्यान 9 ऑक्टोबर 2021 रोजी लेखीपरीक्षा घेण्यात आली आहे. या लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांची दि.9 नोव्हेंबर 2021 ते 11 डिसेंबर 2021 तसेच 25 डिसेंबर 2021 रोजी शारीरीक चाचणी परीक्षा व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली आहे. या परीक्षेतील पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी जळगांवपोलीस दलाच्या www.jalgaonpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उमेदवारांच्या हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय जळगांव यांचेकडे समक्ष हजर राहुन लेखी आक्षेप नोंदवायचा आहे. या तात्पुरत्या निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची सुक्ष्म पडताळणी केली जाणार आहे. जे उमेदवार कागदपत्रांची पुर्तता करणार नाहीत त्यांना भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल. तात्पुरत्या निवड यादीतील पात्र उमेदवारांची लवकरात लवकर वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी करुन त्यांना जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर हजर केले जाणार आहे. पोलीस भरती प्रक्रिये संदर्भातील अंतिम निर्णय पोलीस भरती निवड समितीचा राहणार आहे.