जळगाव : येत्या 17 जानेवारी पासून जळगाव ते मुंबई विमानसेवा सोमवार ते शुक्रवार अशी सलग पाच दिवस राहणार आहे. ट्रू जेट कंपनीतर्फे सोमवार, बुधवार शुक्रवार या तीन दिवशी मुंबईला पोहोचणारे हे विमान पुढे कोल्हपुरसाठी रवाना होणार आहे. मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी हे विमान पुढे नांदेडला रवाना होणार आहे. अशा प्रकारे जळगाव येथून मुंबई, कोल्हापूर आणि नांदेड येथे हवाईमार्गे जाण्याची सोय झाली आहे.
सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी अहमदाबाद येथून निघालेले विमान सकाळी साडे नऊ वाजता जळगाव विमानतळावर दाखल होईल. सकाळी 9.50 वाजता मुंबईसाठी उड्डाण घेतल्यानंतर ते मुंबईला अकरा वाजता दाखल होईल आणि 11.40 वाजता कोल्हापूरसाठी रवाना होईल. जळगाव ते मुंबई आरसीएम सेवेच्या अंतर्गत रुपये 2299 अधिक कर अशी तिकिटाच्या रकमेची प्रती प्रवासी आकारणी होणार आहे. मुंबई ते कोल्हापूर तीन हजारापर्यंत तिकीट लागेल असे म्हटले जात आहे.
मंगळवार व गुरुवार या दिवशी साडे नऊ वाजता जळगावला आलेले विमान पुढे मुंबई व तेथून 11.40 वाजता नांदेडसाठी रवाना होईल. मुंबई ते नांदेडसाठी देखील जवळपास तीन हजारापर्यंत तिकीटाची प्रती प्रवासी आकारणी होणार असल्याचे म्हटले जात आहे.