बिर्याणी खाण्याच्या वादातून खून आरोपी भोसरी पोलिसांच्या ताब्यात

काल्पनिक छायाचित्र

पिंपरी चिंचवड : चिकण बिर्याणी खाण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाल्यामुळे एका तरुणाने आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला होता. 9 जुलै रोजी एमआयडीसी पोलिसात दाखल झालेल्या या घटने प्रकरणी एकाला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. विनोद मधुकर शिंदे(32) असे मयत तरुणाचे नाव आहे. मनोहर शिवाजी कांबळे असे खून करणा-या पोलिसांच्या अटकेतील तरुणाचे नाव आहे.

दोघे मित्र भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. खुनाच्या काही दिवस अगोदर कुणीतरी उरलेली बिर्याणी विनोद आणि आरोपी मनोहरला या दोघांना खायला दिली होती. या बिर्याणीवरुन दोघात वाद सुरु झाला होता. वादादरम्यान विनोदने आरोपीच्या खांद्याला जोरात चावा घेतला होता. त्याचा राग मनोहरच्या मनात सलत होता.

भंगार गोळा करत असताना विनोद एका मोठ्या कचरा कुंडीत कचरा वेचण्यासाठी उतरला होता. त्याच वेळी संधी साधून आरोपी मनोहरने विनोदच्या डोक्यात दगड हाणला होता. यात त्याचा तेथेच मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी मनोहरने तेथून पलायन केले होते. कचरा उचलतांना त्याचा मृतदेह देखील तसाच मोशी येथील कचरा डेपो मधे गेला होता. त्यानंतर या खूनाच्या घटनेचा उलगडा झाला होता.

पोलिसांपासून आपली ओळख लपवण्यासाठी आरोपी टक्कल आणि दाढी वाढवून फिरत होता. तपासाची चक्रे फिरवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या खूनाचा तपास लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here