चाळीस लाखांसाठी तरुणाच्या अपहरणप्रकरणी सात अटकेत

जळगाव : बायोडीझल व्यवसायात चाळीस लाख रुपये बाकी असल्याच्या वादातून तरुणाचे अपहरण करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव येथून एका तरुणाचे नाशिक येथील काही तरुणांनी 12 जानेवारी रोजी अपहरण केले होते. संधी साधत अपहरण झालेल्या तरुणाने पत्नी व बहिणीसोबत मोबाईलवर संपर्क साधून लोकेशन कळवले. त्या माहितीच्या आधारे जळगाव रामानंद नगर पोलिसांनी अपहरणकर्त्या सात जणांना ताब्यात घेत अटक केली आहे.

मयूर वसंत सोनवणे (रा. जिजाऊ नगर जळगाव हल्ली मुक्काम नाशिक) असे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमजद दाऊद सय्यद, शेख बिलाल गुलाम, मजाज दाऊद सय्यद, अब्दुल नासीर गफ्फार, इमरान इलियास शेख, अजिम अजिज शेख, शहानवाज वजीर खान, अबु बकर सलीम मलिक अशी अटकेतील सात जणांची नावे आहेत. शनिवारी सिल्लोड नजीकच्या एका हॉटेलमधून मयूर सोनवणे याची पोलिसांनी सुटका केली. अटकेतील सात जणांना 19 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून दोघे संशयित फरार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here