लग्नानंतर 15 दिवसांतच नववधू गेली पळून

On: July 26, 2020 9:54 PM

अहमदनगर : लग्नानंतर सासरी आलेली नववधू केवळ 15 दिवसातच प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील तरुणासोबत बारामती तालुक्यातील तरुणीचा 25 जून रोजी विवाह झाला होता.

नववधू पळून गेल्या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी विवाह केल्याची माहिती समोर येत आहे.

लग्नापूर्वीच तरुणीचे तरडोली गावातील एका तरुणासोबत प्रेमाचे संबंध होते. पळून जातांना तरुणी जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment