जळगाव : जळगावला महावितरणतर्फे स्मार्ट मीटर प्रीपेड पध्दत सुरु होणार असून त्यात आधी पैसे भरायचे व नंतर विज वापरायची आहे. या प्रणालीत मिटरची केंद्रीय संगणीकृत व्यवस्था राहणार आहे. या प्रणालीमुळे घरोघरी जावून मिटर रिडींग घेण्याचे काम बंद होणार आहे.
मिटर रिडींग घेण्याचे काम बंद होणार असल्यामुळे मिटर रिडर तरुणांच्या रोजगारावर गदा येणार आहे. प्रिपेडचे पैसे संपल्यानंतर विजेचा पुरवठा आपोआप बंद होणार आहे. यामुळे विज चोरीला आळा व बिल वसुलीचा ताण कमी होणार असल्याची शक्यता महावितरण कडून वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.