औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर बंदी आणली गेली होती. आता कोरोनाचा फैलाव ब-याच प्रमाणात आटोक्यात आला असून रुग्णसंख्या कमी झाली आहे.
अजिंंठा, वेरुळ तसेच गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे 3 फेब्रुवारीपासून खुली करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तसे आदेश दिले आहेत. पर्यटकांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. लस घेतलेल्या पर्यटकांनाच पर्यटनस्थळात प्रवेश दिला जाणार आहे. पुर्वीच्या वेळेनुसार पर्यटनस्थळे सुरु राहणार आहेत.