पोलिस स्टेशनच्या सामानाची नासधुस प्रकरणी आरोपींना अटक

शेगाव : डी.जे. वाजवण्यास हरकत घेतल्याने संतप्त जमावातील पाच ते सहा जणांनी शेगाव शहर पोलिस स्टेशनमधील सामानाची नासधुस केल्याप्रकरणी दोन महिलांसह सहा जणांविरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारच्या रात्री घडलेल्या या घटनेने शेगाव शहरात खळबळ माजली होती.

शेगाव शहरातील विश्वनाथ नगर परिसरात एका परिवारात घरगुती कार्यक्रम सुरु होता. मध्यरात्री उशिरापर्यंत या कार्यक्रमात डीजे सुरु होता. या आवाजाला वैतागून परिसरातील लोकांनी पोलिसांना पाचारण केले होते. सुरुवातीला दोघांना चौकशीकामी पोलिस स्टेशनला आणले होते. आमची तक्रार कुणी केली अशी विचारणा करत गोंधळ घालत पोलिस स्टेशनमधील कर्मचा-यांवर हल्ला करत तेथील सामानाची नासधुस करण्याचा प्रकार घडला होता.

सहायक पोलिस निरीक्षक गौतम इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बळवंत चिंतामण बाभुळकर (31) रा. झाडेगाव, भारत अर्जुन बाभुळकर, रा. विश्वनाथ नगर, नरेश अर्जुन बाभूळकर, रा. विश्वनाथ नगर, सुनील बाबुराव खंडेराव रा. कारंजा तसेच दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here