कोरोनामुळे मयताच्या खात्यातून पैसे काढणा-या सायबर टोळीचा पर्दाफाश

आरोपींसमवेत पोलिस तपास पथक

मुंबई : कोविड-१९ आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील नागरीक ऑनलाईन व्यवहारास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वेळ आणि पैशांची देखील बचत होत असते. परंतु या व्यवहारात देखील सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्ल्युप्त्या वापरुन, शक्कल लढवून नागरिकांची आर्थिक फसवणुक करत असल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगारीबाबतच्या विविध तक्रारी गुन्हे प्रकटीकरण शाखा गुन्हे अन्वेशन विभाग कक्ष 11 मुंबई यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुशंगाने वरिष्ठांनी सायबर गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या होत्या.

दिनांक २५/०७/२०२० रोजी कक्ष-११ चे प्रपोनि चिमाजी आढाव यांना गुप्त बातमीदाराकडून एक माहीती मिळाली. त्या माहितीनुसार त्यांना समजले की सायबर गुन्हेगारांची एक टोळी कोविड-१९ च्या आजाराने मयत झालेल्या एका बांधकाम व्यवसायिकाच्या वेगवेगळया बँक खात्यांमधून करोडो रुपये मध्यरात्रीच्या वेळी परस्पर ऑनलाईन पद्धतीने दुसऱ्या खात्यात वर्ग करुन लंपास करणार आहेत. मिळालेल्या या माहितीची प्रपोनि चिमाजी आढाव यांनी गांभिर्याने दखल घेतली.

या बाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती देत त्यांचे मार्गदर्शन घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार सापळा रचून कक्ष-११ च्या पथकाने दहीसर परिसरातील एका झोपडपट्टीत असलेल्या रुममध्ये छापा टाकला. या ठिकाणी चार इसम त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप, मोबाईल फोन व मयत इसमाच्या बँक खात्यांची माहीती असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन व्यवहार करतांना आढळून आले.

या टोळीच्या ताब्यातील मोबाईल फोन तपासले असता त्यात ऑनलाईन व्यवहारासाठी वापरण्यात येणारे अॅप्स, गुगल पे, फोन पे तसेच वन टाईम पासवर्डस पोलीस पथकाला आढळून आले. या टोळीने मयत इसमाच्या नावे असलेल्या बँक खात्यांवरील व्यवहारासाठी बनावट युझर आयडी व पासवर्ड तयार केला होता. त्या बनावट युझर आयडीचा ते वापर करत असल्याचे देखील पोलिस तपास पथकाला आढळून आले.

मयत इसमाच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवरील रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकाचे डुप्लीकेट सिम कार्ड प्राप्त करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार केल्याचे पोलिस पथकाला तपासणीत आढळून आले. त्याच क्रमांकाचे मोबाईल सिमकार्ड देखील त्यांनी प्राप्त केल्याचे सखोल चौकशीत व तपासणीत पथकाला आढळून आले.

सायबर क्राइम गैंग अरेस्ट बाय मुंबई क्राइम ब्रांच

Crime Duniya ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 27, 2020

सदर मोबाईल फोनच्या सहाय्याने वन टाइम पासवर्ड प्राप्त करुन ते वेगवेगळ्या पे अँप्स द्वारे, नेटबँकींगद्वारे मयताच्या बँक खात्यातून पैशाची अफरातफर करत असल्याचे आढळून आले. या टोळीतील एक सदस्य हा मयत व्यापारी काम करत असलेल्या कंपनीचे कार्यालयात नोकरी करत होता. त्यानेच मयताच्या कार्यालयातून अविश्वासाने बँक खात्यांची कागदपत्रे, चेकबुक्स, रोख रक्कम देखील लंपास केली असल्याची माहिती इतर साथीदारांनी केली.

या टोळीतील दुसऱ्या सदस्याने स्वत:चा फोटो मयताच्या आधारकार्डवर चिटकवून त्याची बनावट डिजीटल प्रत देखील तयार केली होती. त्या आधार कार्डच्या सहाय्याने मयताच्या बॅंकेतील रजिस्टर्ड असलेल्या क्रमांकाचे सिमकार्ड विकत घेतले होते. ते सिम त्याने आपल्या मोबाईल फोनमध्ये अॅक्टीवेट केले होते.  

टोळीतील तिसरा सदस्य हा पुर्वी वेगवेगळ्या नामांकीत बॅंकेत कार्यरत होता. त्यानंतर तो परदेशात नोकरीसाठी गेला होता. लॉकडाऊन मुळे तो भारतात परत आला होता. तो लॅपटॉप व मोबाईल फोनच्या आधारे वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरुन ओटीपीचा वापर करुन ती रक्कम दुस-या खात्यात वर्ग करत होता. तो वापरत असलेले सॉफ्टवेअर व त्याचे सर्व्हर हे विदेशी आहेत. त्या सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे लॅपटॉप, मोबाईल फोनचे आयपी अॅड्रेसचे लोकेशन्स परदेशातील दिसतात. त्यामुळे झालेला फ्रॉड हा परदेशातून झाल्याचा बनाव निर्माण केला जात होता.

कोविड-१९ च्या आजाराने मयत झालेल्या व्यापा-याच्या अरलॅब्स प्रा. लिमीटेड, प्रभाव प्रॉपर्टीज लिमीटेड या नामांकीत कंपन्या आहेत. सदर कंपन्यांची तसेच मयत व्यक्तीची वैयक्तीक खाती वेगवेगळया बँकेत आहेत. दिनांक २०/०६/२०२० रोजी या कंपनीचे मालक कोवीड-19 च्या आजाराने मयत झाले आहेत. त्यांच्या वारस पत्नी वयोवृध्द असून दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत.  कंपनीचे मॅनेजर बँकांचे सर्व व्यवहार हाताळत होते. त्यांच्या बँक खात्यांवर रजिस्टर्ड असलेला मोबाईल फोन मॅनेजरच्या ताब्यात होता.

या बाबत कंपनीच्या मॅनेजर सोबत पोलिस तपास पथकाने संपर्क केला असता त्यांनी त्यांचे नमूद कंपनीच्या कार्यालयातून बँकांची कागदपत्रे, चेक बुक्स व रोख रक्कम गहाळ झाल्याची माहीती पथकाला दिली. या प्रकरणी त्यांनी जुहु पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देखील केली आहे. सदर गुन्हा गु.र.न. २२९/२०२० भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भादंवि अन्वये दिनांक २५/०७/२०२० रोजी नोंद करण्यात आला आहे.

या गुन्हयाचा पुढील तपास कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुंबई यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे याबाबत डि.सी बी सी आय.डी. गु.र.क्र, ११३/२०२० अन्वये फेरनोंद घेवून पुढील तपास कक्ष–११ करत आहे.या प्रकरणी सर्व संशयित आरोपींन अटक करण्यात आली असून 31 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप कर्णिक (अतिरिक्त कार्यभार-सह पोलीस आयुक्त (गुन्हे)), पोलीस उप-आयुक्त (प्र-१) अकबर पठाण, यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, पो.नि. रईस शेख, पो.नि. सलील भोसले, स.पो.नि. शरद झिने, विशाल पाटील, स.फौ, नरेंद्र मयेकर, अविनाश शिंदे, अंमलदार सुधीर कोरगांवकर, विनायक साळुखे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, सत्यनारायण नाईक, नितीन शिंदे, राजू गारे, राजेश चव्हाण, दिलीप वाघरे, संतोष माने, सुबोध सावंत, महादेव नावगे, राकेश लोटणकर, अजय कदम, सचिन कदम, जयेश केणी, अजित चव्हाण, निलेश शिंदे, महेश रावराणे, श्रीमती रिया अणेराव, प्रशांत ढगे, उपेंद्र मोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here