किरीट सोमय्यांचा दौरा आणि दोघा पोलिसांचे निलंबन

On: February 13, 2022 12:57 PM

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौ-यात मनपा भेटीची माहिती मिळवली नाही म्हणून शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या दोघा पोलिस कर्मचा-यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिलीप गोरे आणि सतीश कुंभार असे निलंबीत करण्यात आलेल्या दोघा पोलिसांची नावे आहेत. ते गोपनीय शाखेत कार्यरत होते.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा 5 फेब्रुवारी रोजी पुणे येथे दौरा आयोजीत करण्यात आला होता. या दौ-याप्रसंगी ते मनपा आयुक्तांना महापालिकेत निवेदन देण्यासाठी आले होते. याप्रसंगी त्यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. या घटनेची भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन दखल घेण्यात आली. याप्रकाराननंतर पुणे पोलिसांनी या घटनेची कारणे शोधल्यानंतर दोघा पोलिसंना निलंबीत केले आहे. किरीट सोमय्या यांचा पुणे दौरा असतांना गोपनीय शाखेतील या दोघा पोलिस कर्मचा-यांना त्याबाबत माहिती मिळाली नव्हती. तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दुचाकी फेरीची देखील त्यांना माहिती मिळाली नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment