अयोध्या : प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाची अयोध्येत जोरदार तयारी सुरु झाली आहे. या भूमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय खडाजंगी देखील जोरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या सोहळयाची तयारी सुरु आहे.
चांदीची वीट रचून या मंदीराचा पायाभरणी शुभारंभ केला जाणार आहे. या विटेचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या विटेचे वजन २२ किलो ६०० ग्राम एवढे आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान ही चांदीची वीट रचून शिलान्यास करणार आहेत. ही चांदीची विट अयोध्येला पोहोचली आहे.
श्रीराम मंदिराच्या २ हजार फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवली जाणार असल्याची माहिती सध्या एक चर्चेचा विषय झाला आहे. मात्र या टाईम कॅप्सूलची माहिती खोटी असल्याचे ट्रस्टच्या सचिव चंपत राय यांनी म्हटले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण राय यांनी दिले आहे.