जळगाव : गेल्या महिन्यात किचकट तपास शिताफीने उलगडणा-या जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा आज पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आज झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह त्यांचे साथीदार या सत्काराच्या कौतुकाचे प्रमुख भागीदार ठरले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, जितेंद्र राजाराम पाटील, अश्रफ शेख निजामुद्दीन, अक्रम शेख याकुब, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, रणजीत जाधव, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, संतोष मायकल, विजय पाटील, राहुल पाटील, अविनाश देवरे, विनोद पाटील, इश्वर पाटील,दर्शन ढाकणे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, सचिन महाजन, अशोक पाटील आदींचा सहभाग आहे.
भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या पहुर पोलिस स्टेशनचे प्रभारी असलेले प्रताप इंगळे यांच्यासह त्यांचे तत्कालीन सहकारी मोहम्मद अली सत्तार अली सैय्यद, विकास बाविस्कर, जाकीर हरुन मन्सुरी, सोपान पाटील, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे व त्यांचे सहकारी प्रविण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, श्रीकांत चव्हाण, दिपक सोनवणे, उज्वला माळी, रावेर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. शितलकुमार नाईक, हे.कॉ.बिजु जावरे, देवीदास कोळी (मुख्यालय), संदीप पाटील (वाचक शाखा अप्पर पोलिस अधिक्षक), जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे, हे.कॉ. रमेश कुमावत, राहुल पाटील, तत्कालीन चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड आदींसह जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलिस उप निरीक्षक नयन पाटील, सहायक फौजदार विजय पाटील, वासुदेव मराठे, सतिष हाळणोर, चेतन पाटील, विजय दुसाने, तुषार जोशी, नाना मोरे आदींसह इतरांचा समावेश आहे.