तुळजाभवानी मंदीरात पुजा-याचा दागिने चोरीचा प्रयत्न उघडकीस

तुळजापुर :तुळजादेवीला अर्पन करण्यासाठी भाविकाने आणलेली नथ व पैशांचा गल्ला घरी नेण्याचा पुजा-याचा प्रयत्न उघडकीस आला असून त्याला तिन महिने मंदीर बंदी घालण्यात आली आहे. सागर कदम असे या पुजा-याचे नाव आहे. कर्नाटकातील एका भाविकाने देवीला अर्पण करण्यासाठी आणलेली नथ आणि पैशांचा गल्ला चोरी करुन घरी नेण्याचा प्रयत्न पुजारी कदम केला होता. या वस्तूंबद्दल भाविकाने मंदीराच्या नियंत्रण कक्षात चौकशी केली असता पुजा-याचा चोरीचा प्रकार उघड झाला. कदम याने या वस्तू परत आणून दिल्यानंतर त्या वस्तूंची रितसर पावती तयार करण्यात आली.

या मंदीरात विविध गैरप्रकार उघड होत असतात. गेल्या महिन्याभरात एकुण 25 पुजा-यांवर कारवाया झाल्या आहेत. सुरक्षा रक्षकासह धार्मिक व्यवस्थापकांशी अरेरावी करणारा पुजारी अरविंद भोसले व ओंकार हेमंत इंगळे या दोघा पुजा-यांवर तीन महिने मंदिरबंदीची कारवाई करण्यात आली होती. अन्य एका घटनेत मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केल्याबद्दल सुधीर किसनराव कदम या पुजा-यास देखील तिन महिन्यांची मंदीरबंदी करण्यात आली होती. मंदीरबंदी असतांना  देखील कदम याने खासदारांना थेट गाभा-यात नेल्याची घटना उघडकीस आली होती. याबद्दल त्याला सहा महिने मंदीर बंदी घालण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here