इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीला कोरोनामुक्त नऊ दात्यांचे प्लाझ्मा दान

जळगाव :  कोरोनामुक्त व्यक्तींकडून संकलित झालेल्या प्लाझ्मांच्या माध्यमातून कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहे. कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपी करतांना कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या प्लाझ्माची आवश्यकता असते. त्यासाठी प्लाझमा देणारे डोनर आवश्यक असतात.

कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांच्या शरीरातुन रक्तदानाप्रमाणे रक्त काढून त्यातून पांढऱ्या पेशी वेगळया करून पुन्हा लाल रक्तपेशी दात्याच्या शरीरात सोडल्या जातात. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणा-या प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्माफेरेसीस थेरपी युनिटचा  शुभारंभ रेडक्रॉस रक्तपेढी जळगाव येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे व्हीसीच्या माधय्मातून ऑनलाईन करण्यात  आला होता.

या थेरपी अंतर्गत नऊ दात्यांनी आपला प्लाझमा इंडीयन रेडक्रॉस सोसायटीला दान केला आहे. प्लाझ्मा दान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक डोनरला रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी प्लाझ्माफेरेसीस थेरपीची पध्दत व कालावधी प्रक्रियेबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करतात. जिल्हाधिकारी व रेडक्रॉस सोसोयटीचे अध्यक्ष अभिजित राऊत,  जिल्हा प्रशासनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

तालुक्यातील प्रांतधिका-यांच्या मार्फत कोरोनामुक्त  डोनर्सना संपर्क करून संबंधित चाचणी करुनच प्लाझ्माची प्रकिया सुरु केली जाते.  प्रांताधिकारी दीपमाला चोरे, तालुक्यातील  प्रांताधिकारी विनय गोसावी, सीमा अहिरे, राजेंद्र कचरे,अरुण शेवाळे, दीपक धवरे तसेच वैद्यकीय अधिकारी वर्गाचे याकामी सहकार्य मिळत आहे.

रेडक्रॉसचे पदाधिकारी – उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, डॉ. जयप्रकाश रामानंद अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगांव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जळगावचे सिव्हील सर्जन डॉ. नागोराव चव्हाण, डॉ. विजय गायकवाड यांचे याकामी मार्गदर्शन मिळत आहे. यासाठी उपक्रमात रेडक्रॉस रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जैन, जनसंपर्क अधिकारी स्वप्नील वाघ, रक्तपेढी तंत्रज्ञ तिलोत्तम जोशी, अनिल भोळे, राजेंद्र कोळी, रोहिणी देवकर, कामकाज पहात आहे. कोरोना मुक्त  प्लाझ्मा दात्यांनी रेडक्रॉस ब्लड बँकेशी संपर्क करून प्लाझ्मा दानासाठी पुढे यऊन रुग्णसेवेचे आवाहन जिल्हा प्रशासन व रेडक्रॉस पदाधिका-यांच्या वतीने केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here