जळगाव : जळगाव शहरातील पांडे चौकातून गावठी कट्टयासह तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पवन उर्फ माठया केशव गावळे (24) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर, जळगाव असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. तो गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती पो.हे.कॉ. मिलींद सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. सदर बाबतीत पो.कॉ. छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय हत्यार अधिनियम कायद्यानुसार तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक विकास सातदिवे, सचिन पाटील, पोलिस नाईक हेमंत कळसर यांनी केली आहे.
आरोपी पवन गावळे यास 15 हजार रुपये किमतीच्या गावठी बनावटी पिस्टलसह ताब्यात घेतले असून अटक केली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.मिलींद सोनवणे करत आहेत. आरोपी पवन गावळे याने गावठी कट्टा कुठून आणला याबाबत तपास सुरु आहे.