अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपाखाली पोलिस शिपायाविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश रामराव देशमुख (33) रा. अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या दर्यापुर येथील पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.
रितेश व पीडीत तरुणीची जानेवारी – फेब्रुवारी 2020 मधे सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख, मैत्री व भेट झाली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन बलात्कार केला. नंतर त्याने लग्नास नकार दिल्याचे पिडितेचे म्हणणे आहे. याप्रकरणी बलात्कार, विश्वासघात व अॅट्रॉसीटी कलमानुसार रितेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फ्रेजरपुरा पोलिस पुढील तपास करत आहेत.