मालेगाव : कौटूंबिक कलहातून सास-याने चौघा जणांच्या साथीने जावयाला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅम्प भागातील शांतिनिकेतन चौकात 22 फेब्रुवारी रोजी सदर घटना घडली होती. संशयीत सासरे अख्तर अन्सारी, शालक निसार अख्तर, कदीर अन्सारी, व इतर दोघे अशा येवला येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज हुसेन शेख यांचे पत्नीसोबत घरगुती कलह सुरुआहे. या कलहातून रियाज शेख यास सासरे अख्तर यांनी शिवीगाळ केली. इतर दोघांनी मारहाण करत ढकलून दिले तसेच निसारने अंगावर पेट्रोल ओतले व कदीर याने आगपेटी काढून जाळून टाकू असे म्हणत जिवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याबाबतची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. औषधोपचार पुर्ण केल्यानंतर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.